sitename_image

मानस-मंथन

मानस मंथन

नमस्कार!

मी पूर्वाश्रमीची शालिनी भगवान मेहेंदळे आणि विवाहनंतरची मानसी माधव मोकाशी. वडिलांची बदलीची नोकरी , त्यामुळे वेगवेगळ्या गावी जाता आलं. वेगवेगळ्या शाळांत शिक्षण झालं. महाविद्यालयात पदवी घेत असतानाच एका बालकादंबरिकेचा स्वैर अनुवाद करून लेखनाचा श्रीगणेशा केला होता.

त्यानंतर आकाशवाणीमध्ये कार्यक्रम अधिकारी म्हणून रुजू झाल्यावर पुणे,मुंबई, पणजी या केंद्रांवर काम करताना विविध माणसं भेटली, विविध अनुभवही आले. विवाहानंतर ‘सोलापूर तरुण भारत’ मध्ये उपसंपादक म्हणून काम करताना बातम्यांबरोबरच दिवाळी अंक, रविवार व बुधवारची मध्यमा पुरवणी यांचं संपादन करताना अनुभवविश्र्व विस्तारलं.

बाल, महिला यांच्यासाठी लिहितानाच काही सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांनाही हात घातला. वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या प्रोत्साहनामुळे जे लिखाण झालं, त्यातील काही या आंतरजालाद्वारे आपल्यापुढे ठेवत आहे.

अमृतातेहि पैजा जिंकणाऱ्या माय मराठीच्या विस्तीर्ण दालनात माझी ही छोटीशी मुशाफिरी. वाचकांच्या मतप्रदर्शनामुळे माझ्या या मुशाफिरीला बळ मिळणार आहे. म्हणून प्रतिसादाचं स्वागत आहे.

--मानसी मोकाशी



इथे तुमचा प्रतिसाद तुम्ही लिहू शकता.

ताजे लेखन

माझ्या लेखनात चरित्र, मुलाखती, साहित्य परिचय अशा विविध प्रकारांचा समावेश आहेः -

मोठ्या व्यक्तींची अल्पचरित्रे

परिचय

मुलाखती

microphone

बालसाहित्य

मी लिहिलेली "पराक्रमी त्रिकूट" ही बाल कादंबरिका पुण्यातील "केसरी" प्रकाशनाच्या सह्याद्री मासिकातील छावा या बालविभागात क्रमाने प्रसिद्ध झाली होती. वाचकांना ती pdf रूपात वाचण्यासाठी येथे उपलब्ध आहे.

चातुर्यकथांचे नायक


"कुत्रा" या विषयावर, श्वानप्रेमींसाठी माहिती मिळवून मी लिहिलेले २५ लेख तुम्हाला येथे वाचता येतील.


या शिवाय माझ्या नेहमीच्या विषयांपेक्षा वेगळे विषय घेऊन लिहिलेले हे लेख जरूर वाचा.